स्थापना २० - ०२ - १९६०

02342-243278, 243279 IFSC - IBKL0116APC , GSTIN No : 27AACAT3237B1ZU

बँकेचा इतिहास

बँकेचे शिल्पकार
स्व. अण्णासाहेब तात्यासो आवटी
आपले प्रेरणास्थान
स्व. बाळासाहेब बापूसो वग्याणी
आपले श्रद्धास्थान
स्व. जिनदत्त आण्णा थोटे

दि ९ मार्च १९६७ साली स्थापना झालेल्या या बँकेची सुरवात अतिशय छोटी होती . सुरवातीला लहान असणाऱ्या या बँकेला अनेकांच्या तळमळीचे ,जिद्दीचे ,परिश्रमाचे हातभार लागून त्याचे विस्तीर्ण स्वरूप झालेले दिसते. दि आष्टा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक लि बँकेच्या स्थापनेपूर्वी या गावात एकच बँक कार्यरत होती. व इतर कोणत्याही बँकेच्या शाखा अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आष्टयात नव्हती. त्यामुळे व्यवसायिक, व्यापारी, ग्रामीण कारागीर यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष होऊ लागले . त्याना आवश्यक तेवढा व गरजेच्या वेळी कर्ज पुरवठा होत नव्हता. कै. अण्णासाहेब आवटी, कै. बाळासाहेब वग्याणी, कै. जिनदत्त नाना थोटे, कै. विरसंगप्पा महाजन, डॉ. बी. एस. बापट, डॉ. एस. पी. गोर्डे, कै. आनंदराव भोपे, आदी प्रमुख मंडळींनी आपल्या सहकाऱ्यांना एकत्र करून बँक स्थापनेची मुहूर्त मेढ केली. दि. ९ मार्च १९६७ रोजी हि बँक अस्तित्वात आली म्हणजे या बँकेचा जन्म झाला. दि . ९ मार्च १९६७ रोजी हि बँक अस्तित्वात आली म्हणजे या बँकेचा जन्म झाला. ९ मार्च १९६७ रोजी बँकेचे कामकाज सुरु झाले. बँकेच्या उद्घाटन समारोह जिल्हाधीकारी श्री. आर. जी. शिंदे यांच्या हस्ते व मा. वसंतदादा पाटील यांच्या अध्यक्षते खाली मोठ्या थाटात संपन्न होऊन शुभारंभ झाला बँकेच्या सुरवातीला अवघ्या ४ महिन्यात रु ५१२.५२ पैसे इतका नफा बँकेने दाखवला. पहिल्याच वर्षी नफ्यात येणारी बँक म्हणून मानाचे पद प्राप्त करणारी बँक ठरली केची स्वतःची सुसज्य वास्तू असावी दूरदर्शी पण संचालक मंडळांनी प्रारंभी पासून ठेवल्या मुळे बँकेचे कारभार सुरवातीपासूनच स्वमालकीच्या इमारतीत सुरु आहे.

 

९७५ साली पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी २० कलमी आर्थिक कार्यक्रम जाहीर केला. बँकेने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून तो राबिवला, दुर्बल घटक, भूमिहीन शेतमजूर, कारागीर, फळविक्रेते, हातगाडीवाले याना सवलतीच्या व्याज दारात कर्जे देण्यात अली. म्हणजे बँकेने कर्ज पुरवठा करताना याना अग्रहक्क दिला. बँकेच्या या कार्याबद्दल दि. २० फेब्रुवारी १९७६ रोजी श्रीमती इंदिरा गांधींनी बँकेला खास पात्र देऊन अभिनंदन केले आहे धान्य भावाने उच्चांक गाठला होता यावर उपाय म्हणून बँकेने सभासद व बिगर सभासदाच्या सोईसाठी स्वस्त धान्य विक्रीची अभिनव योजना आखली.या व्यवहारात होणारा तोटा निव्वळ नफ्यातून खर्च करून बँकेने दुष्काळात त्याकाळी दिलासा देऊन अत्याआवश्यक कार्य केले सामान्य जनतेची पिळवणूक नष्ट व्हायची असेल तर बँकेचा आधार हवा यासाठी बँकेने सामान्य ग्राहकाच्या अडचणी लक्षात घेवून वेळोवेळी नियम, व्यवहार, कायदे संभाळून त्याच्या व पर्यायाने गावच्या अर्थव्यवस्थेस हातभार लावलेला आहे.बँकेने आजपर्यंत केलेली प्रगती अभिमानास्पद आहे, सर्वांच्या सहकार्याने व आशीर्वादाने बँकेला शौर्य प्राप्त झालें आहे. यामागे सभासद , ठेवीदार, आजी माजी संचालक मंडळ, अधिकारी सेवक वर्ग यांचा लाभलेला हातभार मोलाचा आहे.